श्री सर्वोत्तम परिचयआपलं स्वागत

नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित।
यथानुशक्या चित्तवित्त, सर्वोत्तमी लावावे।।

श्री सर्वोत्तम - हे मध्यभारतातून सातत्यानं प्रकाशित होणारं पहिल मराठी नियतकालिक. दिवाळी वार्षिकाला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर गुढीपाडवा, श्रावण, दिवाळी वार्षिक अणि मकर संक्रांत असे चार अंक प्रकाशित होत असून त्यांनाही महाराष्ट्रातून व बाहेरूनही वाढता प्रतिसाद लाभत आहे. हिन्दी भाषिक माळव्यातील पहिलं मराठी त्रेमासिक असा गोरव श्री सर्वोत्तमचे मिळवला असून त्याची प्रसार संख्या दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ़, गुजरात, हरियाणापर्यन्त सतत वाढता आहे. श्री सर्वोत्तममधून केवळ इंदुरातीलच नव्हे तर सबंध मध्यभारतातील प्रथितयश मराठी लेखक कवी- सुह्रदांचं लेखन मराठी वाचकांच्या समोर सादर करून त्यांना एक नवं दालन उघडून द्यावं व रसिकांची मान्यता मिळवून द्यावी असा या प्रकाशनामागचा प्रमुख हेतु आहे. त्रैमासिक असल्याने यात अधिकाधिक नूतन सदरं देण्याचा आमचा मानस सतत असतो. आपण रसिक वाचक आहातच. कदाचित काही लिखाणही करीत असाल. आपण आमच्या या प्रयत्नात सहयोग कराल अशी अपेक्षा आहे. श्री सर्वोत्तममध्ये प्रकाशित होणारे साहित्य स्वीकारण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा राहील, याची कृपया नोंद घ्यावी. मागच्या वर्षी एक नवा उपक्रम होती घेतला होता. श्री सर्वोत्तमचे संपादक कै. बाळकाका उध्वरेषे यांच्या स्मृतिदिनानिमित एक अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा आयोजित करण्यात येते. श्री सर्वोत्तम साठी आपल्या सभासदांपैकी व आपल्यी क्षेत्रातील नवीन वर्गणीदार होऊ इच्छिणार्यांचं सहर्ष स्वागत आहे. असा हा प्रयास मध्यभारतात कदाचित प्रथमच असावा.


आमचा संघ

सल्लागार

डॉ. बाबा साहेब तराणेकर
मेघना निरखीवाले

प्र. संपादक

अश्विन खरे

कार्य. संपादक

अरविंद जवळेकर

सहयोगी

जयश्री तराणेकर माधव साठे

व्यवस्थापक

दिगंबर भाटे

जाहिरात विभाग

चित्रा धोडपकर

प्रसार विभाग

विनोद ऊटवाले

प्रकाशक

चन्द्रेश गौड

जनसम्पर्क अधिकारी - सोशल मीडिया

ऋचा करपे

 

 

 
 
 
 
 
 
 
 

 

महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा